10 मिनिटात चविष्ट मशरूम पिझ्झा | पिझ्झा बनविण्याची सोपी पद्धत | How to make Tasty Pizza at home
नमस्कार! या वर्षी लॉकडाउन मध्ये बाहेरील खाद्यपदार्थाच्या चटपटीत चवीची उणीव आपल्या सर्वांना नक्कीच भासत असेल.
म्हणूनच आज मी आपल्याला मशरूम पिझ्झा बनविण्याची सोपी पद्धत शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला या लॉकडाउनमध्ये देखील बाहेरील खाद्यपदार्थाच्या चटपटीत चवीची उणीव भासणार नाही.
चला तर मग, जाणून घेऊयात 2 मिनिटात🕐 चविष्ट मशरूम पिझ्झा🥪 बनविण्याची सोपी पद्धत !
📋 साहित्य:
📌पिझ्झा बेस
📌 बारीक चिरलेली शिमला मिरची
📌 बारीक चिरलेला कांदा
📌 बारीक कापलेला टोमॅटो
📌 तूप
📌 टोमॅटो सॉस
📌 चीझ
📌 कापलेले मशरूम, इत्यादी.
👩🍳 कृती:
👉 पिझ्झा बनवण्यासाठी सर्वप्रथम व्हेज मिश्रण तयार करू. एका छोट्या कढई मध्ये 1 चमचा तूप घाला त्यात शिमला मिरची, कांदा, टोमॅटो हे सर्व जरा वेळ परतून घ्या.
👉त्यानंतर त्यात वरून 1 चमचा टोमॅटो आणि चीलीसॉस घाला.
👉छोट्या कढई मध्ये कापलेले मशरूम तूप / तेलात जरा वेळ परतून घ्या.
👉 आता पिझ्झा बेस एका प्लेट मध्ये ठेवा व त्यावर तूप आणि टोमॅटो सॉस लावा आणि वेज चे मिश्रण त्यावर नीट पसरवून लावा नंतर त्यावर चीझ किसून/ बारीक स्लाइस कापून टाका आणि मशरूम ठिकठिकाणी सजवून ठेवा.
👉आता पॅन वर थोडेसे तूप घाला.
👉पॅनवर पिझ्झा ठेवा आणि झाकण बंद करून मंद आचेवर त्याला बेक करा.
तुमचा चविष्ट मशरूम पिझ्झा🥪 तयार आहे
Video : Click here
#पिझ्झा #व्हेजमशरूमपिझ्झा #पिझ्झाबनविण्याचीपद्धत #किचनकेमिस्ट्री #sandwichathome #sandwichrecipe #sandwich #cheesesandwich #Tastysandwich #kitchenchemistry #Recipes #Howtomakeasandwich #fresh #homemade #madewithlove #AdvayCooks
Comments
Post a Comment